Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांचे होणार मूल्यमापन

By admin | Updated: January 15, 2017 02:26 IST

गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा दर्जा घसरत आहे. त्यामुळे महापालिकेवर टीका केली जाते. या शाळांता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले

मुंबई : गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा दर्जा घसरत आहे. त्यामुळे महापालिकेवर टीका केली जाते. या शाळांता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले, उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी महापालिका शाळांचे दर्जा उंचवण्याचे काम शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी २४ विभागातील शाळांच्या इमारतीची पथक तपासणी करण्यात येणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत हा तपासणी करण्यात येणार आहे. पहिले ते दहावी म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक अशी दोन्ही शाळांची तपासणी या उपक्रमात केली जाणार आहे. इमारत तपासणी करत असताना त्या इमारतीत असणाऱ्या सर्व शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. शाळेची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकात शिक्षणाधिकारी, संबंधित परीमंडळाचे उपशिक्षणाधिकारी, संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी (शाळा) आणि संबंधित इमारतीतील सर्व शाळांचे विभाग निरीक्षक यांचा समावेश असणार आहे. (प्रतिनिधी)