मुंबई : इथियोपियाहून मुंबईला आणलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईर्पयत पोहोचविण्यात मुंबईच्या बालगृहाला यश आले आहे. 14 महिन्यांच्या काळानंतर 17 सप्टेंबर रोजी मायदेशी परतताना चेह:यावर ‘आसू अन् हसू’ असलेल्या तिने सर्वाचा निरोप घेतला. डोंगरी बालगृहाच्या प्रशासनाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
आफ्रिकेतील इथियोपियाहून त्या मुलीला घरकामासाठी एका श्रीमंत कुटुंबाने मुंबईत आणले. मात्र त्या ठिकाणी अवघे 1क्-15 दिवस वास्तव्य करून तेथून तिने पळ काढला. त्यानंतर मुंबई सेंट्रल येथे 8 जुलै, 2क्13 रोजी रेल्वे पोलिसांना ‘ती’ सापडली. या पोलिसांनी तिला डोंगरी बालगृहात सोडले. त्यानंतर तिची ‘सॉर्बिक’ ही भाषा वेगळी असल्यामुळे तिच्याशी संवाद साधण्यात आणि तिचे म्हणणो समजून घेण्यात बालगृह प्रशासनाला अडथळे आले. यावर उपाय म्हणून दुभाषीच्या मदतीने तिच्याशी संवाद साधला. अखेर इथियोपिया दूतावास आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तिच्या आईवडिलांची माहिती मिळविण्यात यश आले.
आफ्रिकेतील इथियोपियात राहणारे तैबी सुफ (वडील), फाते हसन (आई) आणि मोठा भाऊ असे तिचे कुटुंबीय होते. तिच्या पालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी तिला घेऊन जाण्याची तयारी दर्शविली. लहान मुलांसाठी काम करणा:या आशियाना आणि अवर चिल्ड्रन या दोन स्वयंसेवी संस्थांनी त्या मुलीला मायदेशी परतण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले. (प्रतिनिधी)
माङया चाळीस वर्षाच्या कालावधीतील परदेशातील मुलीची ही पहिलीच कहाणी होती. तिचे आणि आमचे भावनिक नाते निर्माण झाले होते, ते कायम राहील. अडचणींमुळे आणि क्लिष्ट प्रक्रियेमुळे विलंब झाला अखेरीस त्या चिमुरडीला आम्ही तिचे घरटे परत मिळवून दिल्याचा आनंदच आहे.
- विजया मूर्थी, बालकल्याण समिती;
अध्यक्ष, महिला व बालकल्याण विभाग
अन् ती मराठी शिकली!
इथियोपियाला परतण्याच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी ती मराठी भाषाही शिकल्याचे संस्थेच्या अधिका:यांनी सांगितले. इथियोपियाला जाण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थेच्या एका कार्यक्रमात तिने
भावुक होऊन आभार मानले.