Join us

इस्टेट मॅनेजरच्या लॉकरची झाडाझडती?

By admin | Updated: April 21, 2015 05:46 IST

धावत्या लोकलमध्ये २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झालेला म्हाडाचा इस्टेट मॅनेजर (मिळकत व्यवस्थापक) सुनील निकम याच्या मालमत्तेची

मुंबई : धावत्या लोकलमध्ये २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झालेला म्हाडाचा इस्टेट मॅनेजर (मिळकत व्यवस्थापक) सुनील निकम याच्या मालमत्तेची चौकशी लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. निकमच्या नावे बँक लॉकर असून त्यात त्याने काय काय दडविले आहे याचा तपासही एसीबीकडून होणार आहे.१७ एप्रिलला मुंबई सेंट्रल ते चर्चगेट प्रवासादरम्यान निकमला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीने अटक केली. अटकेनंतर लगोलग त्याच्या उल्हासनगरच्या पाचपांडव कॉलनीतल्या निवासस्थानी धाडी घातल्या. या धाडींमध्ये त्याने गेल्या वर्षी हे निवासस्थान सहा लाख रुपयांना खरेदी केल्याची बाब समोर आली. त्याच्या व कुटुंबीयांच्या नावे बँकेत मुदतठेव, सेव्हिंग सर्टिफिकेटच्या रूपात ११ लाख ७७ हजार रुपये जमा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच निकमच्या नावे एक बँक लॉकरही असल्याची माहिती एसीबी अधिकाऱ्यांना मिळाली. लवकरच एसीबी या लॉकरची झाडाझडती घेतील, असे समजते. (प्रतिनिधी)