Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात फॉरेन्सिक विद्यापीठ स्थापन करा

By admin | Updated: March 26, 2015 01:59 IST

भारतातील पहिले फॉरेन्सिक विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचार करण्याची सूचना केली आहे़

मुंबई : सर्व बाबतीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात भारतातील पहिले फॉरेन्सिक विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचार करण्याची सूचना केली आहे़राज्यात फॉरेन्सिक लॅबची कमतरता असल्याने अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्यास विलंब होतो़ त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब असावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका एका सामाजिक संघटनेने दाखल केली आहे़न्या़ नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी प्रत्येक जिल्ह्यात फिरती लॅब सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती न्यायालयाला दिली़ या लॅबमध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम असेल़ ती घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करेल़ या टीमला याचे प्रशिक्षण दिले जाईल़ त्यामुळे तपास अधिक जलदगतीने होईल, असे अ‍ॅड़ वग्यानी यांनी न्यायालयाला सांगितले़त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील सूचना केली़ हे विद्यापीठ स्थापन झाल्यास पोलीस अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना तेथे त्याचे इत्यंभूत प्रशिक्षण दिले जाऊ शकते़ आणि याने गुन्ह्यांचा तपास करण्यास मदतच होईल, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले़ (प्रतिनिधी)