Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुलासह एस्केलेटर जिन्यांना जून २०१६ची डेडलाईन

By admin | Updated: June 19, 2015 00:14 IST

पश्चिम रेल्वेच्या मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत

भार्इंदर : पश्चिम रेल्वेच्या मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता वाढीव कॅमेऱ्यांसाठी निधी कमी पडत असल्यास खासदार निधी घ्या, अशी सूचना खा. राजन विचारे यांनी रेल्वे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांनी आयोजिलेल्या बैठकीत केली. रेल्वे स्थानकात पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा पादचारी पूल बांधण्यात येत असून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. या पुलासह एस्केलेटर बसविण्याचे काम जून २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली. या स्थानकांदरम्यान सफाई पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असताना ती अद्यापही संथ गतीने सुरु असल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करुन महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्याची सूचना केली. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे प्लॅटफॉर्मची रुंदी कमी पडत असल्याने तेथील स्टॉल्सचे क्षेत्रफळ कमी करुन प्रवाशांना जास्त जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.मीरा-भार्इंदर रेल्वे स्थानकातील विकासासंदर्भात आयोजिलेल्या बैठकीत विशेष कार्यकारी अधिकारी राजीव त्यागी, मुख्य अभियंता कुलभूषण आदी रेल्वे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मीरारोड रेल्वेस्थानकात १८ तर भार्इंदर रेल्वे स्थानकात ४८ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.