Join us  

महाविकास आघाडीची समीकरणे?, समित्यांच्या निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 1:19 AM

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असताना या आघाडीची समीकरणे केडीएमसीत होऊ घातलेल्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कल्याण : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असताना या आघाडीची समीकरणे केडीएमसीत होऊ घातलेल्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सदस्य आणि सभापतीपाठोपाठ, महिला व बालकल्याण आणि शिक्षण समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. काही समित्यांच्या सभापतीपदावर केडीएमसीत युतीत असलेल्या भाजपचा आता दावा असताना काँग्रेसच्या साथीने शिवसेना ही पदे पुन्हा पदरात पाडून घेण्याचे संकेत मिळत आहेत.साधारण जानेवारीमध्ये स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. स्थायी समितीचे आठ सदस्य शनिवारी निवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने समितीवर कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागले आहे.समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आठ, भाजप सहा आणि काँग्रेस, मनसे प्रत्येकी एक अशी १६ सदस्य संख्या आहे. शनिवारी निवृत्त होणा-या आठ सदस्यांमध्ये चार सदस्य शिवसेनेचे, तीन भाजपचे आणि एक सदस्य मनसेचा आहे. या प्रक्रियेनंतर साधारण जानेवारीत नवीन सभापतीपदाची निवडणूक होईल. सध्या सभापतीपद शिवसेनेकडे आहे. पुढील सभापतीपदावर भाजपचा दावा असताना आमचाच सभापती असेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.त्याचबरोबर डिसेंबरअखेर महिला-बालकल्याण समिती सदस्यांची नव्याने निवड होणार आहे. या समितीमध्ये शिवसेना पाच, भाजप चार आणि काँग्रेस, मनसे प्रत्येकी एक, असे ११ सदस्य आहेत. तौलनिक संख्याबळाच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. यंदा हे पद भाजपकडे आहे. जानेवारी महिन्यात होणाºया या समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा दावा राहणार आहे.दरम्यान, शिक्षण समिती सभापतीपदावर मात्र भाजपचा दावा राहणार आहे. सध्याचे समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे आहे. शिक्षण समितीचे पक्षीय बलाबल पाहता तेथेही शिवसेना पाच, भाजप चार आणि काँग्रेस, मनसे असे प्रत्येकी एक, असे ११ सदस्य आहेत. येथेही शिवसेना सदस्यांची संख्या अधिक असून पुढच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या साथीने भाजपला सभापतीपदापासून दूर ठेवण्याचे संकेत मिळत आहेत.महापौरपदाची चर्चाही बासनात२०१५ च्या केडीएमसीच्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षांमध्ये एक वर्ष महापौरपद भाजपला मिळेल, असे ठरले होते. पहिले अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेने भूषविल्यावर त्यानंतर ते एक वर्षासाठी भाजपकडे जाईल, अशी शक्यता होती. मात्र, उल्हासनगरमधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे महापौरपद शिवसेनेने आपल्याकडेच कायम ठेवले आणि ते फॉर्म्युल्यानुसार आणखी दीड वर्षे भूषविले. हा कालावधी नोव्हेंबरअखेर संपत आहे.सध्या महाविकास आघाडीचे स्थापन झालेले सरकार पाहता शिवसेना कल्याणचे महापौरपद भाजपसाठी सोडेल, अशी शक्यता नाही. भाजपनेही महापौरपद मिळावे, याबाबत कोणतीही हालचाल न केल्याने त्यांच्याकडूनही चर्चा बासनात गुंडाळली गेल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :कल्याण डोंबिवली महापालिकाडोंबिवली