Join us

उद्योजकांना हवी ‘एक खिडकी’

By admin | Updated: February 11, 2015 00:26 IST

: हद्दपार होत चाललेली उद्योग नगरीला पुन्हा उभारी येण्यासाठी उद्योगाला आवश्यक विविध परवानगीं एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची गरज आहे.त्यासाठी तातडीने

मुंबई : हद्दपार होत चाललेली उद्योग नगरीला पुन्हा उभारी येण्यासाठी उद्योगाला आवश्यक विविध परवानगीं एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची गरज आहे.त्यासाठी तातडीने एक खिडकी योजना राबवा, अशी आग्रही मागणी येथील उद्योजकानी केली.महापालिकेच्यावतीने मुंबईचे ब्रॅण्डींग सुरु करण्यासाठी स्थापन व्यवसाय विकास कक्षांतर्गत व्यवसाय सल्लागार परिषदची पहिली बैठक आज पार पडली़यावेळी बड्या उद्योग कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली़ कुठल्याही व्यवसायिकाला एका इमारतीसाठी किमान आठ ते ३७ प्रकारच्या विविध विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते़ ही प्रक्रिया किचकट, वेळखाऊ व अडचणीची असते़ त्यामुळे एकाच व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवून एक खिडकी योजनेद्वारे सर्व परवानगी मिळवून देण्याची व्यवस्था करावी, अशी सुचना जवळपास सर्वच उद्योग कंपन्यांनी केली़पारिषदेत आयुक्त सीताराम कुंटे यांनी सोयी-सुविधा, करप्रणाली, विविध परवाने संदर्भात समस्या व सुचना कॉर्पोरेट कंपन्यांकडून मागविल्या आहेत़ बैठकीला कॉर्पोरेट क्षेत्राच्या पालिकेकडून अपेक्षा, नवीन विकास आराखड्यात अपेक्षितबदल याबाबत त्यांची प्रतिक्रिया या परिषदेतून मागविण्यात आली आहे़ त्यानुसार मुंबईत बिझनेस डेव्हल्पमेंटची नियमावली तयार होणार आहे़ यामध्ये इंडियन मर्चंट्स चेंबर,वेस्टर्न इंडिया फिल्म प्रड्युसर्स असोसिएशन, रेस्टॉरेंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया, पिरामल ग्रुप, महिन्द्रा आणि महिन्द्रा लि़, रिलायन्स इंडस्ट्रीज लि़, ज्वेलर्स असोसिएशन आणि जिंदाल फाऊंडेशन या कंपन्यांचा समावेश होता़ (प्रतिनिधी)