Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीचा उत्साह

By admin | Updated: March 9, 2015 01:12 IST

लेझीम... ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि हर हर महादेव... जय शिवराय यांच्या जयघोषात

नवी मुंबई : लेझीम... ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि हर हर महादेव... जय शिवराय यांच्या जयघोषात नवी मुंबईत ठिकठिकाणी पारंपरिक मिरवणूक काढून शिवरायांचे स्मरण करण्यात आले. वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर इत्यादी परिसरांमध्ये आयोजन केले होते. राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या वतीने वाशीतील शिवाजी चौकामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाशी ते घणसोलीपर्यंत शिवज्योत निघाली. जय भवानी मित्रमंडळ आणि शिवतेज मित्रमंडळाने घणसोलीत शिवजयंतीचे आयोजन केले होते. शिवनेरी किल्ला येथून शिवज्योत आणली होती. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने बोनकोडे गाव येथे शिवजयंती साजरी केली. (प्रतिनिधी)