Join us

उत्साह कायम़़

By admin | Updated: September 7, 2015 02:35 IST

न्यायालयाने घातलेले निर्बंध, बड्या आयोजकांनी उत्सवातून घेतलेली माघार आणि दुष्काळाचे सावट अशा स्थितीत ढाक्कुमाकुमचा ताल किती घुमणार

न्यायालयाने घातलेले निर्बंध, बड्या आयोजकांनी उत्सवातून घेतलेली माघार आणि दुष्काळाचे सावट अशा स्थितीत ढाक्कुमाकुमचा ताल किती घुमणार, याविषयी असलेली साशंकता गोविंदांनी फोल ठरवली. गोविंदा आणि प्रेक्षकांनी रविवार चांगलाच गाजवला. ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘गोविंदा रे गोपाळा..’ अशा वर्षानुवर्षे वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांबरोबरच ‘गो गो गो गोविंदा’सारखी नवी गाणीही वाजवून गल्लोगल्ली गोविंदांना प्रोत्साहन दिले गेले. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत एक्का म्हणून बालगोविंदांनाच वरच्या थरावर चढवण्यात आले. कुठे सहा तर कुठे नऊ थर लावले जात असताना उत्कंठा नेहमीप्रमाणेच ताणली गेली. पाण्याचा वापर मात्र काटकसरीने करण्याचे भान सर्वांनीच ठेवल्याचे दिसले. कडक उन्हात थर लावताना गोविंदांची कसोटी लागत होती. जय मल्हार आणि बजरंगी भाईजानही उत्सवात ठिकठिकाणी लक्ष वेधून घेत होते. हटके हेअरकट्स करून, रंगीबेरंगी विग्ज घालून आलेले प्रेक्षक दाद मिळवून जात होते. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले चित्रपट, मालिकांतील कलाकार यामुळे दहीहंडी उत्सवाला सेलीब्रिटी लूक आला होता.