पनवेल : केबल, डीटीएच सेवा, सिनेमागृहे, गेम झोन, करमणूक कर या माध्यमातून पनवेलच्या कर विभागाने नोव्हेंबरअखेर पावणेतीन कोटी रुपयांचा महसूल गोळा केला. या करमणूक करामध्ये सिनेमागृहांचा तब्बल ५० लाखांचा वाटा आहे. महसूल वाढ करण्याकरिता तहसील कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे नायब तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले.केबलचालकांकडून पनवेलमध्ये केबलधारकांची खरी आकडेवारी दिली जात नव्हती. त्याचा थेट परिणाम महसुलावर होत होता. परंतु बऱ्याच ठिकाणी सेटटॉप बॉक्स लागल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. केबलचालकांकडून यापूर्वी दरमहा जो कर भरला जात होता. आता या करापोटी दरमहा जास्त रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होत आहे. यात सिनेमागृहे ही सर्वाधिक कर भरणारी ठरली आहेत. नव्या मल्टीप्लेक्सला करमणूक करात सवलत देण्यात आली आहे. आता ३२ लाखांचा कर सिनेमागृहांकडून भरला जात आहे. याशिवाय पनवेल तालुक्यात व्हिडीओ सेंटर आणि गेमच्या माध्यमातून सुमारे ३५ लाखांचा भरणा झाला आहे.
करमणूक कराची कोटी - कोटी उड्डाणे
By admin | Updated: December 23, 2014 22:24 IST