Join us

आतशबाजीने आनंदाला उधाण

By admin | Updated: October 24, 2014 00:57 IST

शहरात फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चोपडा पूजन करण्यात आले.

नवी मुंबई : शहरात फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चोपडा पूजन करण्यात आले. यामुळे नवी मुंबईत दिवाळी सेलीब्रेशनला उधाण आल्याचे चित्र आहे.दिवाळीनिमित्त शहरात सर्वत्र रोशणाई करण्यात आली आहे. प्रत्येक घराच्या खिडकीमध्ये आकाशकंदील लावण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांबाहेर व परिसरातील वृक्षांवरही रोषणाई केल्याचे चित्र पाहावयास मिळते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितील पाचही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी चोपडा पूजन केले. व्यापाऱ्यांच्या परिवारातील सर्व सदस्य चोपडा पूजनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. काही व्यापाऱ्यांनी सामूहिक चोपडा पूजनही केले. तर दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)