Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांचे बेमुदत आंदोलन स्थगित

By admin | Updated: July 6, 2015 23:32 IST

अभियंत्यांचे बेमुदत आंदोलन स्थगित

अभियंत्यांचे बेमुदत आंदोलन स्थगित
उपायुक्त ढाकणे यांच्यावर कारवाईचे संकेत
मुंबई : पालिका अधिकार्‍यांना मारहाण करणारे उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त अजय मेहता यांनी आज दिले़ त्यामुळे अभियंत्यांचे आज मध्यरात्रीपासूनचे बेमुदत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे़ मात्र ढाकणे यांच्यावर कारवाई होईपर्यंत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे़
बोरीवली येथील घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कर्मचारी विजय मानकर यांना मारहण केली होती़ तसेच सहाय्यक अभियंता रमेश चौबे यांना मारहाणीचा प्रयत्न व आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांचा ढाकणे यांनी अवमान केला़ यामुळे संतप्त अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने आज मध्यरात्रीपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता़
याचा परिणाम अत्यावश्यक सेवांनाही बसणार असल्याने हे आंदोलन मागे घेण्याची विनंती प्रशासनाने अभियंत्यांना केली होती़ या प्रकरणाची चौकशी करणारे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी आपला अहवाल आज आयुक्तांना सादर केला़ त्यानुसार ढाकणे यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले़ संध्याकाळी उशीरा झालेल्या कृती समितीच्या बैठकीत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला़ (प्रतिनिधी)