Join us

मध्य रेल्वेचा खोळंबा संपेना

By admin | Updated: October 4, 2014 02:32 IST

देखभाल आणि दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच मध्य रेल्वेचे बुरे दिन काही संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : देखभाल आणि दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच मध्य रेल्वेचे बुरे दिन काही संपता संपत नसल्याचे  दिसून येत आहे. शुक्रवारी कुर्ला स्थानकात लोकलमध्ये बिघाड आणि कल्याण स्थानकात एका लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वे प्रवाशांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर तब्बल 19 वेळा मध्य रेल्वेची मेन लाइन आणि हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. यावरून हे बुरे दिन संपणार कधी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 
मागील दोन महिन्यांत मेगाब्लॉक न घेतल्याने लोकल सेवा विस्कळीत होत असल्याचा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी गुरुवारी सफाई अभियानादरम्यान केला. मात्र ऑगस्ट महिन्यात पाचपैकी तीन रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. तर सप्टेंबर महिन्यात केवळ एकच ब्लॉक रद्द करण्यात आला. त्यामुळे मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून करण्यात आलेला हा दावा कितपत योग्य आहे, हे तपासून पाहण्याची गरज आहे. मुळात देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली मेगाब्लॉक घेतल्यानंतरही सातत्याच्या या घटनांमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवर लोकल विस्कळीत झाल्याच्या एकूण 19 घटना घडल्या आहेत. यात आठ घटना ऑगस्ट महिन्यात तर उर्वरित घटना सप्टेंबर महिन्यात घडल्याचे रेल्वेतील सूत्रंनी सांगितले. रुळाला तडा, सिग्नल यंत्रणोत बिघाड, लोकल रुळावरून घसरणो, लोकलमध्ये बिघाड अशा घटनांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)
 
ऑगस्ट महिन्यातील घटना
2 ऑगस्ट : नाहूर ते मुलुंडदरम्यान रुळाला तडा
11 ऑगस्ट : वाशिंदजवळ कसारा लोकलमध्ये बिघाड
11 ऑगस्ट : सीएसटी ते मशीददरम्यान ओव्हरहेड वायर 
तुटली
12 ऑगस्ट : सीएसटीजवळ ओव्हरहेड वायर तुटली 
22 ऑगस्ट : रे रोड ते कॉटन ग्रीनदरम्यान एका लोकलमध्ये 
बिघाड
26 ऑगस्ट : विद्याविहार स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर
 तुटली 
28 ऑगस्ट : सह्याद्री एक्स्प्रेसच्या लोकोमध्ये तांत्रिक बिघाड
29 ऑगस्ट : ठाणो-कर्जत लोकलचा डबा रुळावरून घसरला
 
2 सप्टेंबर : घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.
3 सप्टेंबर : वाशी ते मानखुर्ददरम्यान रुळाला तडा.
9 सप्टेंबर : कोपर ते दिवादरम्यान रुळाला तडा.
10 सप्टेंबर : पंजाब मेल सीएसटीजवळ रुळावरून घसरली. 
11 सप्टेंबर : कल्याण ते ठाकुर्लीदरम्यान सिग्नल यंत्रणोत बिघाड.
14 सप्टेंबर - पनवेल, डबा घसरला. 
 
15 सप्टेंबर : शिवडी ते कॉटन ग्रीनदरम्यान लोकलमध्ये बिघाड.
21 सप्टेंबर : मशीद ते सीएसटीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.
26 सप्टेंबर : करी रोड स्थानकाजवळ कल्याण लोकलमध्ये तांत्रिक बिघाड.
30 सप्टेंबर : डोंबिवली स्थानकात टिटवाळा लोकलचा डबा घसरला. 
30 सप्टेंबर : पावसामुळे दैना - करी रोड स्थानकात पत्र ओव्हरहेड वायरवर पडला तर कॉटन ग्रीनजवळ झाड पडले.