Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीकडे सेनेचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 27, 2015 01:38 IST

केेंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेने मोदी सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले़ ‘सामना’मध्ये अवघ्या दोन कॉलममध्ये मोदींच्या भाषणाची दखल घेण्यात आली़

मुंबई : केेंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेने मोदी सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले़ ‘सामना’मध्ये अवघ्या दोन कॉलममध्ये मोदींच्या भाषणाची दखल घेण्यात आली़ केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे अवजड उद्योग खात्याचे मंत्री आहेत़ तर राज्यातील फडणवीस सरकारमध्ये अर्ध्याहून अधिक मंत्री शिवसेनेचे आहेत़ असे असले तरी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, भूसंपादन विधेयक अशा काही मुद्द्यांवर शिवसेनेचे मतभेद आहेत; आणि ते वारंवार व्यक्तही केले जातात़ मुखपत्रातून तर सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलिया या देशाला भेट देऊन भारताच्या वतीने मदत केली़ तेव्हाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपेक्षा मंगोलियन नागरिक भाग्यवान आहेत, अशी बोचरी टीका करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)