Join us

टँकरच्या धडकेत चिमुरडीचा अंत

By admin | Updated: April 15, 2015 02:15 IST

घराबाहेर खेळत असलेल्या ३वर्षीय चिमुकलीचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री विक्रोळीमध्ये घडली.

विक्र ोळीतील घटनामुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या ३वर्षीय चिमुकलीचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री विक्रोळीमध्ये घडली. विधी चंद्रेश सिंग असे या चिमुकलीचे नाव असून, या प्रकरणी आरोपी चालकाला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. विक्रोळी पूर्वेकडील टागोरनगरमध्ये राहणारी विधी सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास जेवणानंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडली. त्याचवेळी टँकरच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)