पिंपरी : बाजारपेठेत जे होलसेल विक्री करणारे व्यापारी आहेत, त्यांचीच होलसेल दुकानांपुढे किरकोळ विक्रीची दुकाने आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका आणि पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे मंगळवारी या भागात पाहणी केली. मंगळवारी बाजारपेठ बंद असल्याने वर्दळ आणि वाहतूककोंडी नव्हती. बाजारपेठेत दुकानांच्या गल्ल्याही अरुंद आहेत. मोठ्या दुकानदारांनी छोट्या किरकोळ विक्रेत्यांना आपल्या दुकानापुढे जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. छोट्या विक्रेत्यांकडून मोठे दुकानदार त्या जागेचा मोबदलाही वसूल करतात. स्वत:च्या दुकानापुढे मोकळी जागा असावी, ग्राहकांना त्यांचे वाहन उभे करता यावे, एवढीही जागा त्या दुकानापुढे ठेवली जात नाही. मालवाहू वाहनांची बाजारपेठेत दिवसभर वर्दळ असते. शहराच्या अन्य भागांत व्यवसाय करणारे अनेक विक्रेते या बाजारपेठेत होलसेल माल खरेदी करतात. तो माल नेण्यासाठी त्यांनी आणलेली वाहनेसुद्धा बाजारपेठेत, थेट दुकानांपर्यंत आणली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकची भर पडते. (प्रतिनिधी)
दुकानदारांकडूनच अतिक्रमण
By admin | Updated: June 24, 2015 05:21 IST