केळवा - माहीम : केळवे परिसरातील दुग्ध विकास प्रकल्पाच्या जागेवर खाजगी लोकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढण्याची मागणी दुग्धविकास प्रकल्प पालघरच्या व्यवस्थापकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.दुग्ध विकास प्रकल्पाची पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जागा आहे. या जागेतील केळवेरोड पूर्व, केळवे रोड चौकी व झांझरोळी परिसरातील जागेवर काही इसमांनी अतिक्रमणे केली आहेत. याबाबत तपशील देवून नवीन पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर या जागा शासकीय कार्यालये, शासकीय उपक्रम राबविण्यासाठी अत्यावश्यक आहेत. या जागेवरील अतिक्रमणे काढण्यात यावीत व नागरिकांना न्याय द्यावा, याकरिता संबंधित पोलीस कार्यालय, ग्रामपंचायती व महसूल विभागाला लेखी पत्रे देऊन दुग्ध विकास प्रकल्पाच्या व्यवस्थापकांनी ही अतिक्रमणे दूर करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली आहे. (वार्ताहर)
दुग्ध प्रकल्पाच्या जमिनीवर अतिक्रमण
By admin | Updated: August 24, 2014 23:34 IST