समीर कर्णुक / मुंबई : चेंबूर येथील सिध्दार्थ कॉलनी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनशताब्दी उद्यानाकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी उद्यानाच्या डागडुजीबाबत उत्सुक नाहीत. परिणामी उद्यानाची रया गेली आहे. आणि आता तर या उद्यानावर मद्यपी आणि आणि जुगार्यांंंनी अतिक्रमण केल्याने समस्यांत आणखीच भर पडल्याचे दूर्देव आहे.पूर्व द्रुतगती मार्गावरून कुर्ल्याकडे जाणार्या सर्व्हीस रोडलगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनशताब्दी उद्यान स्थित आहे. सद्यस्थितीमध्ये उद्यानात केवळ दोन ते झाडे शिल्लक राहिली आहे. तीन वर्षापुर्वींच आमदार निधीतून या उद्यानाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र उद्यानाची संरक्षण भिंत आणि मुख्य कमान सोडल्यास काहीच काम या निधीतून झाले नाही. भिंतीचे आणि कमानीचे कामही सुमार दर्जाचे झाल्याने वर्षभरातच पुन्हा या उद्यानची अवस्था जैसे थे झाली आहे.लाखो लोकवस्ती असलेल्या या सिध्दार्थ कॉलनीत हे एकमेव उद्यान आहे. मात्र या उद्यानात मनोरंजनाची साधने नाहीत. त्यामुळे येथील बच्चे कंपनीला शेजारील परिसरात खेळण्यासाठी जावे लागत आहे. यावर स्थानिक नागरिक आणि बच्चे कंपनीकडून रोषही व्यक्त केला जात नाही. मात्र पालिका प्रशासनाला याचे काहीच पडलेले नाही.उद्यानात आसन व्यवस्था नाहीत. लहान मुलांकरिता मनोरंजनाची साधने नाहीत. उद्यानाबाहेर कचरा कुंडी असल्याने येथे कचर्याचे ढिग जमा होत आहेत. उद्यानाचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जात आहे. उद्यानात दिवाबत्तीची व्यवस्था नाही. त्यामुळे उद्यानाचा ताबा मद्यपींनी घेतला आहे. परिणामी या उद्यानाची अवस्था एखाद्या खिंडारासारखी झाली आहे..................परिसरात हे एकमेव उद्यान असताना त्याची अशी दुरावस्था असल्याने आमच्या मुलांनी खेळण्यासाठी जायचे तरी कुठे? पालिकेने डागडुजी केल्यास मुलांसाठी हा चांगला पर्याय होईल.- सिमा आवळे (स्थानिक रहिवासी).................उद्यानासाठी इतकी मोठी जागा असताना या परिसरातील मुलांना शेजारच्या परिसरात खेळण्यासाठी जावे लागत आहे. हे दुर्देव आहे.- सुरेश गाडे (स्थानिक रहिवासी).................सुट्टीत लहान मुलांचे मनोरंजन व्हावे म्हणून उद्यानाची आवश्यक आहे. ज्या कुटूंबियांना सुट्टीत बाहेरगावी जात येत नाही. अशांना उद्यान हे एक मनोरंजनाचे साधन आहे. मात्र या उद्यानाची अशी दुरावस्था झाल्याने मनोरंजनाचे साधन नाही.- शुभम शर्मा (स्थानिक रहिवासी).................
आंबेडकर उद्यानावर जुगार्यांंच अतिक्रमण
By admin | Updated: May 14, 2014 23:17 IST