अलिबाग : उरण येथील प्राथिमक शाळेतील दोन विद्यार्थीनींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षक दत्ता जाधव आणि या गुन्हय़ात साथ दिल्याप्रकरणी मुख्याध्यापिका अनिता पाटील यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिक्षकीपेशाला काळिमा फासणा:या या कृत्याबद्दल त्यांना रायगड जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.ए. पाटील यांनी प्रत्येकी 1क् वर्षे सक्तमजुरी आणि 2क् हजार रुपये दंड ठोठावला आहे.
उरण येथे 2क्13मध्ये ही घटना घडली होती. जाधव यांनी पाचवी ते सातवीच्या दोन विद्यार्थिनींवर बलात्कार आणि अन्य अनेक विद्यार्थिनींचा विनयभंग केला होता. बलात्काराच्या मुख्य गुन्ह्याव्यतिरिक्त विनयभंग, लैंगिक अत्याचार, अश्लील वर्तन आणि अश्लील छायाचित्रे काढल्याप्रकरणी दोघांनाही पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 2 हजार रुपये दंड, अशीही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा एकत्रच भोगायच्या आहेत. दंडाच्या रकमेतून दोन पीडित विद्यार्थिनींना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
संपूर्ण राज्यातील शिक्षणक्षेत्रचे या निकालाकडे लक्ष लागले होते. जानेवारी 2क्13मध्ये उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. या दोघांनाही जिल्हा आणि त्यानंतर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)