Join us

खादी ग्रामोद्योग विभागातील योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्माण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST

मुंबई : नव्याने उद्योग करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी राज्य खादी व ग्रामोद्योग विभागातील योजना खूप फायदेशीर असून, त्यांचा फायदा लोकांनी ...

मुंबई : नव्याने उद्योग करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी राज्य खादी व ग्रामोद्योग विभागातील योजना खूप फायदेशीर असून, त्यांचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. खादी ग्रामोद्योग मंडळाने तयार केलेल्या ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा सांगणारे कॉफी टेबल बुक व चित्रफितीचे अनावरण सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.

या वेळी हातकागद संस्थेने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विविध वस्तूंचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा, सहसचिव संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, अर्थसल्लागार विद्यासागर हिरमुखे, राजकुमार डांगर, डॉ. मेधा वाके, सुधीर केंजळे, नित्यानंद पाटील, दीपाली पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्शु सिन्हा यांनी तर आभार बिपीन जगताप यांनी मानले.