Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील कर्मचाऱ्याला घरात घुसून लुटले

By admin | Updated: December 3, 2014 02:24 IST

बँकेतून रोकड काढून परतलेल्या महेश मारुती नेवसे (२६) या मंत्रालय कर्मचाऱ्याला घरात घुसून लुटल्याची घटना काल संध्याकाळी सातच्या सुमारास भांडुपमध्ये घडली.

मुंबई : बँकेतून रोकड काढून परतलेल्या महेश मारुती नेवसे (२६) या मंत्रालय कर्मचाऱ्याला घरात घुसून लुटल्याची घटना काल संध्याकाळी सातच्या सुमारास भांडुपमध्ये घडली. चोरट्यांनी लूटमारीआधी महेशला चाकूच्या धाकात बेदम मारहाणही केली आणि ८६ हजारांची रोकड हिसकावून पळ काढला. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.मंत्रालयातील महिला व बालकल्याण विभागात मदतनीस म्हणून काम करणारा महेश भांडुप पश्चिमेकडील टेंभीपाडा, परदेशी चाळीत आई-वडील, भावासह राहतो. काल दुपारी दोनच्या सुमारास घराजवळील बँकेतून ६० हजार रुपये काढून महेश घरी आला होता. दरम्यान सायंकाळी फेरफटका मारण्यास तो घरी आला. छोटा भाऊ कामानिमित्त बाहेर होता तर आई-वडील गावी असल्यामुळे महेश घरात एकटाच होता. अशात सायंकाळी सातच्या सुमारास घरात देवपूजा करत असताना तीन अनोळखी तरुण त्याच्या घरात शिरले. चाकूचा धाक दाखवत महेशला तिघांनी लाथाबुक्क्यांनी बुकलून काढले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला महेश बेशुद्ध पडला. दरम्यान, महेशने केलेल्या वर्णनावरून तिन्ही आरोपींचे स्केच पोलिसांनी तयार केले आहे. (प्रतिनिधी)