Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी सोयी-सुविधांवर भर : सुमित ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:07 IST

सर्वसामन्यासाठी मर्यादित वेळेत रेल्वे सुरू झाली, त्याचे कशाप्रकारे व्यवस्थापन केले जात आहे ?राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे ...

सर्वसामन्यासाठी मर्यादित वेळेत रेल्वे सुरू झाली, त्याचे कशाप्रकारे व्यवस्थापन केले जात आहे ?

राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळली आहे. त्यानुसार आता पश्चिम रेल्वेने एकूण १३६७ फेऱ्यांपैकी ९५ टक्के म्हणजे १३०० लोकल फेऱ्या सध्या सुरू आहेत. तसेच प्रवाशांच्या मदतीला प्रत्येक स्थानकावर आरपीएफ, जीआरपी आणि राज्य पोलीस दलाचे जवान तैनात आहेत. तसेच नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष दिले जात आहे. काेरोनाबाबच्या नियमांचे पालन करा, याचे सातत्याने आवाहन केले जात आहे. तसेच डब्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नवीन उपक्रम सुरू आहेत का?

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही निर्जंतुकीकरण करण्यासाठी पथके तयार केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी हात स्वच्छ करण्याची आणि प्रवाशांचे सामान बांधण्याची सोय असलेल्या किओस्कची सुरुवात मुंबई सेंट्रल स्टेशन येथे करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवाशांना काय आवाहन कराल?

प्रवाशांनी राज्य सरकारने वेळा दिल्या आहेत त्याचे पालन करावे. कोरोनाविरोधात लढा जिंकण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी कोरोना संबंधित नियमांचे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, निर्जंतुकीकरण यावर भर द्यावा. कोरोनासा हरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रवाशांनीही आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.