Join us  

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरण : दहशतवाद्यांनी पसरवली अफवा? भोईवाडा पोलिसात तक्रार अर्ज दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 7:28 AM

एल्फिन्स्टनचाही प्रकार घातपात असू शकतो, असा दावा करत एक तक्रार अर्ज भोईवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - सर्वसामान्यांना टार्गेट करुन त्यांच्यात अफवा पसरवून मानवी जीव घेणारी अतिरेकी संघटना सध्या हातपाय पसरत आहे. यात कोणत्याही शस्त्राचा वापर न करता मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा बळी घेण्यात येतो. हल्ली कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि खबऱ्यांच्या नेटवर्कमुळे घातपातीच्या कारवाईला आळा बसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेला चेंगराचेंगराचाही प्रकार घातपात असू शकतो, असा दावा करत एक तक्रार अर्ज भोईवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) या घटनेचा तपास करण्यात यावा, अशी मागणी   रिपब्लिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष फैजल युसूफ बनारसवाला यांनी या अर्जाद्वारे भोईवाडा पोलिसांकडे केली आहे. जाणीवपूर्वक अफवा पसरवून हा घातपात घडवण्यात आला आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मानवी स्वभावाचा अभ्यास करून प्रशासकीय चुकांचा गैरफायदा घेत हल्ले करण्याची वृत्ती सध्या फोफावत आहे. याच धर्तीवर एल्फिन्स्टन पुलावर अपघात हा घातपात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधिताने लेखी तक्रार भोईवाडा पोलीस स्थानकात दाखल केली आहे.  

तक्रारदाराने या प्रकरणी कलम 302चा गुन्हा दाखल करुन एनआयएकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही रिपब्लिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष फैजल युसूफ बनारसवाला यांनी केली आहे.  

शुक्रवारी नेमके काय घडले परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर?

कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने शुक्रवारी खरी ठरली. एलफिन्स्टन रोड स्थानकावर शुक्रवारी (29 सप्टेंबर )सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी होऊन 8 महिला आणि एका लहान मुलासह तब्बल 22 जणांचा यात बळी गेला, तर 39 प्रवासी जखमी झाले. तर शनिवारी उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही पहिलीच घटना आहे. देशभरात नवरात्रीचा उत्साह संचारलेला असताना दस-याच्या तोंडावर मुंबईकरांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. मुंबईच्या इतिहासात आणखी एका ‘ब्लॅक फ्राय डे’ची नोंद झाली.

पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोडवरील पुलावर नेहमीच गर्दी असते. मध्य रेल्वेतील परळ स्थानकाला जोडणारा हा पादचारी पूल असल्याने प्रवासी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. शुक्रवारी सकाळी परतीच्या पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. यामुळे एलफिन्स्टन रोड स्थानकातील पायºया निसरड्या झाल्या होत्या. पावसामुळे प्रवासी आडोशासाठी पुलावर उभे राहिले. स्थानकांवरील गर्दी वाढत असतानाच अचानक ‘पूल कोसळला’, ‘शॉटसर्किट झाले’ अशा अफवांचे पेव फुटले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ६ ते ७ फुटांच्या पूलावरून बाहेर जाण्यासाठी प्रत्येक प्रवासी धडपडत होता. यावेळी स्थानकावर एकाचवेळी अप आणि डाऊन दिशेने लोकल आल्यामुळे गर्दीत आणखी भर पडली.

गर्दीमुळे रेटारेटीचा जोर वाढल्याने अनेक प्रवासी पायांखाली तुडवले गेले. या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त झाली. रेल्वे प्रशासनाने आणि राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे मुंबईतील रेल्वेचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.मृतांची नावेमुकेश मिश्रा, शुभलता शेट्टी, सुजाता शेट्टी, सचिन कदम, मयुरेश हळदणकर, अकुंश जयस्वाल, जोतिबा चव्हाण, सुरेश जयस्वाल, चंद्रभागा इंगळे, तेरेसा फर्नांडिस, रोहित परब, अ‍ॅलेक्स कोरिया, हिलोनी देढिया, चंदन गणेश सिंग, मुश्ताक रईस, तेली, प्रियांका पासरकर, मोहम्मद शकील, श्रद्धा वर्पे, मीना वरुणकर, विजय बहादूर, मसूद अलाम, सत्येंद्रकुमार कनोजियाजखमींची नावेआकाश परब, अजय कुमार, अनुज कुमार, अखिलेश चौधरी, जितेंद्र, जमालुद्दीन, इस्माइल खान, मोहम्मद शेख, नितेश, नरेश कांबळे, पीयूष ठक्कर, पुलवासी, प्रल्हाद कनोजिया, राहून अमिन, रुपेश, रमेश चौधरी, राकेश कदम, राहुल, श्रीनिवास, समीर फारुख, सूरज गौड, सुदीप तावडे, सुरज पटवा, रितेश राठोड, सागर पाटील, वसिम शेख, सुनील मिश्रा, विक्रम चौघुले, प्रमोद बागवे, अपर्णा सावंत, आशा पिंपळे, धुनिष्ठा जोशी, महानंदा सावंत, प्रतिभा, प्रज्ञा बागवे, शरयु गावडे, श्रद्धा नागवेकर, सीमा कोरीटाइमलाइनसकाळी ९.३० : परतीच्या पावसाची मुंबईत जोरदार हजेरी९.४५ ते १०.१० : स्थानकांवर गर्दीचे प्रमाण वाढले१०.३० : रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती१०.३३ : स्थानिकांचा एल्फिन्स्टन स्टेशन मास्तरला फोन१०.४५ : स्थानिकांचा मदतीसाठी पुढाकार११.०० : सर्व पोलिस स्थानकांना अलर्टच्या सूचना११.३० : एल्फिन्स्टन दुर्घटनेत तीन प्रवासी ठार झाल्याचे वृत्त११.३२ : रेल्वे पोलीस व सुरक्षा बलाचे अधिकारी घटनास्थळी११.३८ : केईएम रुग्णालयात तीन मृत्यूंचा दुजोरा११.४५ : केईएममधून १५ प्रवासी ठार झाल्याची माहिती११.५० : पालिकेसह शासकीय यंत्रणेचे मदतकार्य१२.०० : एनडीआरएफचेपाच जवान घटनास्थळी दाखल१२.१० : वरिष्ठ रेल्वे अधिका-यांकडून अपघात स्थळाची पाहणी१२.२५ : केईएममधून२२ जण ठार झाल्याची माहिती

टॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीभारतीय रेल्वेपश्चिम रेल्वे