Join us
Daily Top 2Weekly Top 5

एल्फिन्स्टन अपघात; ‘त्या’ कुटुंबातील एकाला नोकरी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 14:30 IST

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील पीडित कुटुंबांचे सर्वेक्षण करून ज्या कुटुंबातील आर्थिक आधार हरपला असेल, त्या कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी

मुंबई : एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील पीडित कुटुंबांचे सर्वेक्षण करून ज्या कुटुंबातील आर्थिक आधार हरपला असेल, त्या कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.विखे पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र पाठवले. पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेऊन त्यांनी या पत्राची एक प्रत सोपवली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले. या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेले अनेक प्रवासी त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.केवळ एकरकमी आर्थिक मदत देऊन ही कुटुंबे पुन्हा उभी राहू शकत नाही. त्यामुळे अशा कुटुंबातील एका व्यक्तीस त्याच्या पात्रतेनुसार रेल्वे विभागात नोकरी द्यावी, विखे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबई उपनगरी रेल्वेआता बास