मुंबई : वरळी, शिवडी, ना.म. जोशी मार्ग व नायगाव येथील बीडीडी चाळीत राहणा:या पोलीस पत्नींनी गुरुवारी वरळीच्या पोलीस परेड मैदानावर जाहीर सभा घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, भाषण करताना ‘महायुतीचे राज्य आल्यास एका वर्षात पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावू’, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर हे मतदारसंघातील आमदार असतानाही पोलिसांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित राहणो ही खेदाची बाब असल्याचे म्हणत फडणवीस यांनी अहिर यांना टोला लगावला. पोलीस पत्नींनी उभारलेल्या आंदोलनाचा अखेरचा टप्पा जवळ आला असून येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी पोलीस पत्नींनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांच्या पगारातून पोलीस प्रशासन महिन्याला 4 हजार 5क्क् ते 5 हजार रुपये कापत आहे. गेल्या 3क् वर्षापासून सेवा करणा:या पोलिसांकडून शासनाने घरांच्या किमतीहून अधिक रक्कम गोळा केली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यासाठी पोलीस प्रशासन पोलिसांच्या पगारातून 14 रुपयांची कपात करत आहे. मात्र 1981 सालापासून ही कपात प्रशासनाने साबां विभागात जमा केलेलीच नाही. त्यामुळे साबां विभाग घरांची डागडुजी करत नाही. परिणामी घरांची दुरवस्था झाली असून कधीही कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंत्रलय आणि साबां विभागातील कर्मचा:यांसह घुसखोर राहत असलेली घरेही शासनाने त्यांच्या नावावर केली आहेत. मात्र प्रामाणिकपणो भाडे भरणा:या पोलिसांना घरे देण्यात शासना काचकूच का म्हणून करत आहे, असा सवाल पोलीस पत्नींनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
मुंबईतील एकूण 35
बीडीडी इमारतींमध्ये पोलिसांची 2 हजार 916 घरे आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजेच 1 हजार 446 घरे ही वरळी बीडीडीत आहेत.