Join us  

अकरावी प्रवेश प्रक्रिया : तिसऱ्या यादीत कटआॅफ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:35 AM

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत कोट्याच्या जागांचा गोंधळ सुरू असतानाच, मंगळवारी प्रवेशाची तिसरी यादी महाविद्यालयांनी जाहीर केली. विशेष म्हणजे, यामध्ये महाविद्यालयांच्या गुणवत्ता यादीचा कटआॅफ मागच्या गुणवत्ता यादीपेक्षा चढा असल्याचे दिसून आले.तिसºया गुणवत्ता यादीत एकूण ५४,७२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, त्यापैकी १३,७३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. ८,७९० विद्यार्थ्यांना दुसºया, तर ६,९५५ विद्यार्थ्यांना तिसºया पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.वाणिज्य शाखेकडे कलतिसºया यादीतही वाणिज्य (कॉमर्स) शाखा निवडणाºया विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, ७,५०९ विद्यार्थ्यांना यासाठी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. कला (आर्ट्स) शाखेच्या २,१७७ तर विज्ञान (सायन्स) शाखेच्या ३,५७३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. ३१ जुलै ते २ आॅगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करायचे आहेत, तर ३ ते ४ आॅगस्टपर्यंत पसंतीक्रम बदलता येतील.अकरावी प्रवेशासाठी कॉल सेंटरप्रवेशासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी कॉलसेंटर सुविधा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉल सेंटरसाठी ०२० - ६७४८५५५६ असा टोल फ्री क्रमांक आहे.कटआॅफ अचानक का वाढला?अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. मात्र, या वेळी अनेक नव्वदीपर विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. कारण त्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पसंख्याक कोट्यातील जागा या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांतूनच महाविद्यालय स्तरावर भरण्याचे निर्देश दिल्याने, अनेक नामांकित महाविद्यालयांतील या जागा इतर विद्यार्थ्यांना मिळू शकल्या नाहीत आणि विद्यार्थी गुणवत्ता यादीबाहेर राहिले.मात्र त्यानंतर, नागपूर खंडपीठाने पुन्हा इनहाउस कोट्यातील जागा महाविद्यालयांना सरेंडर करण्याची मुभा दिल्याने महाविद्यालयांच्या रिक्त जगांत वाढ झाली. त्यामुळे तिसºया यादीसाठी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलून उपलब्ध महाविद्यालयांतील जागांवर अर्ज केले. त्यामुळे कटआॅफ पुन्हा वाढला.के सी कॉलेजआर्ट्स - ८९.४ %कॉमर्स - ९०.५ %सायन्स - ८७.२ %जयहिंद कॉलेजआर्ट्स - ९२.०० %कॉमर्स - ९०.६ %सायन्स - ८७.१६ %वझे केळकर कॉलेजआर्ट्स - ८८ %कॉमर्स - ९०.६ %सायन्स - ९६.८ %एच आर कॉलेजआर्ट्स - जागा उपलब्ध नाहीतकॉमर्स - ९०.८%सायन्स - जागा नाहीतएन एम कॉलेजआर्ट्स - जागा उपलब्ध नाहीतकॉमर्स - ८९.८३%सायन्स - जागा नाहीतमुलुंड कॉलेजआर्ट्स - जागा उपलब्ध नाहीतकॉमर्स - ९०.४%सायन्स - जागा उपलब्ध नाहीतसेंट झेव्हिअर्स कॉलेजआर्ट्स - जागा उपलब्ध नाहीतकॉमर्स - जागा उपलब्ध नाहीतसायन्स - ८९%सी एच एम कॉलेजआर्ट्स - ६५.८%कॉमर्स - ८२.८%सायन्स - ९२.८%पाटकर कॉलेजआर्ट्स -७०.२%कॉमर्स - ८७.६ %सायन्स - ९०.६%हिंदुजा कॉलेजआर्ट्स - जागा उपलब्ध नाहीतकॉमर्स - ८८.१६ %सायन्स - जागा उपलब्ध नाहीतमिठीबाई कॉलेजआर्ट्स - ८६ %कॉमर्स - ८९.१६%सायन्स - ८८.४२%रुईया कॉलेजआर्ट्स - ९७.८%कॉमर्स - जागा उपलब्ध नाहीतसायन्स - ९३.६%रुपारेल कॉलेजआर्ट्स - ८६ %कॉमर्स - ८९ %सायन्स - ९१.४ %शाखा एकूण अर्ज प्रवेश मिळालेले विद्यार्थीकला ७,७७२ ४,९६२वाणिज्य ८१,२५७ ३४,७८९विज्ञान २७,२६३ १४,३९८एमसीव्हीसी ९४२ ५७८एकूण विद्यार्थी १,१७,२३४ ५४,७२७

टॅग्स :विद्यार्थी