Join us

वीज ग्राहकांना बेस्टचा ‘शॉक’

By admin | Updated: March 5, 2015 01:49 IST

वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करत वीज ग्राहकांना झटका दिला असतानाच आता १ एप्रिल २०१५ पासून बेस्टच्या वीज ग्राहकांनाही वीज दरवाढीचा झटका बसणार आहे.

मुंबई : टाटा पॉवर वगळता महावितरण आणि रिलायन्स या दोन वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करत वीज ग्राहकांना झटका दिला असतानाच आता १ एप्रिल २०१५ पासून बेस्टच्या वीज ग्राहकांनाही वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. बेस्टच्या १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिटसाठी ३ रुपये तर १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना प्रतियुनिटसाठी ६ रुपये ४० पैसे एवढी किंमत मोजावी लागणार असून, हे वीजदर ३१ मार्च २०१६ पर्यंत लागू राहणार आहेत.बेस्टच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ सालीच बेस्टने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता. सदर वीज दरवाढीचा प्रस्ताव हा ‘बहु दर’ (मल्टी टेरिफ) अशा आशयाचा होता. २०१३ साली आयोगाने २०१४, २०१५ आणि २०१६ या आर्थिक वर्षांसाठी वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. दरम्यान, टाटा पॉवरच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावानुसार १०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट २ रुपये ६२ पैसे आणि १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट ४ रुपये ५६ पैसे दरवाढ मागण्यात आली आहे. (प्रतिनिधी)टाटाची ३०० युनिटपर्यंत वीज स्वस्तटाटाला काही महिन्यांपूर्वीच शहरातही वीज पुरवठा करण्याचा परवाना मिळाल्यानंतर येथे बेस्ट विरुद्ध टाटा असे ‘शीतयुद्ध’ रंगले आहे. शिवाय टाटा उपनगरातही विजेचा पुरवठा करते. बेस्ट, रिलायन्स आणि महावितरणच्या तुलनेत टाटा पॉवरची ३०० युनिटपर्यंतची वीज स्वस्त आहे.बेस्टच्या वीजदरातील बदल (रु. प्रतियुनिट)युनिटसद्याचे दर१ एप्रिल २०१५ लागू होणारे दर०-१००२.६५३१०१-३००५.३५६.४०३०१-५००७.५०८.८०५०१९.५५१०.८०