Join us

वीज ग्राहकांना दुप्पट बिले !

By admin | Updated: July 15, 2015 02:09 IST

बेस्टची गाडी रस्त्यावर ठेवणाऱ्या विद्युतपुरवठा विभागाचा कारभार सुरळीत ठेवण्यात उपक्रमाला तारेवरच कसरत करावी लागत आहे. या विभागातीने सुमारे अडीच लाखांहून

मुंबई : बेस्टची गाडी रस्त्यावर ठेवणाऱ्या विद्युतपुरवठा विभागाचा कारभार सुरळीत ठेवण्यात उपक्रमाला तारेवरच कसरत करावी लागत आहे. या विभागातीने सुमारे अडीच लाखांहून अधिक वीज ग्राहकांना चक्क दुप्पट बिले पाठविली आहेत. मात्र हा तांत्रिक घोळ लवकरच निस्तरण्यात येईल, असा दिलासा बेस्ट प्रशासनाने आज दिला.बेस्टमार्फत कुलाबा ते माहीम, सायन या पट्ट्यातील सुमारे १० लाख ग्राहकांना विजेचा पुरवठा केला जातो. गेली अनेक वर्षे नफ्यात असलेल्या या विभागामुळेच वाहतूक विभागाचा कारभार सुरू आहे. मात्र गेल्या एक-दोन वर्षांत या विभागामधील गोंधळामुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. वाहतूक विभागाची तूट वीज ग्राहकांच्या बिलातून आतापर्यंत वसूल करण्यात येत होती. त्यानंतर बिले विलंबाने पोहोचत असल्याने ग्राहक हैराण झाले होते. मात्र यावेळीस तांत्रिक चुकीमुळे मे आणि जून २०१५ या महिन्यांची बिलांमध्येच घोळ झाला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण आहे. याबाबत बेस्टने ग्राहकांची माफी मागितली आहे. तसेच ज्यांनी बिल भरलेले नाहीत त्यांनी बिल कमी करून घेणे व ज्यांनी बिल भरले त्यांचे बिल जुलै महिन्यात अ‍ॅडजस्ट करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)