सादील अनुदानातून वीजबिल अदा करता येणार
शिक्षण विभागाची मान्यता : १० हजारांहून अधिक शाळांतील देयके थकीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांतील १०,६७१ शाळांची तब्बल ५८८.६३ लाख इतकी कायमस्वरूपी बंद वीज देयकांची रक्कम थकीत असून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस ती देणे बाकी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने ही थकीत रक्कम या एका वर्षापुरती विशेष बाब म्हणून सादील अनुदानातून देण्यास परवानगी दिली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या प्राथमिक शाळांसाठी भौतिक, शैक्षणिक व दैनंदिन सुविधांचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षीच्या वेतन खर्चाच्या ४ टक्के सादीलावर खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच शाळांतील वीजबिल (१००० प्रति महिना रुपयांच्या मर्यादेत) इतर निधीतून वीजबिल भरले नसल्यास सादील अनुदानातून भागविण्यासाठी विभागाने याआधीच मान्यता दिली आहे.
............................