डहाणू : येथील हनुमान मंदिराजवळील रस्त्यावर पडून असलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने मोटरसायकलस्वार मनिष अनिल कर्नावट (४०) रा. डहाणू याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. घटनेनंतर कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत नागरिकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला. सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास डहाणू आगर येथील हनुमान मंदिराजवळ वीज प्रवाह सुरु असलेली तार रस्त्यात पडली होती. त्याचवेळी तो मोटरसायकलने जात असताना तारेला स्पर्श होऊन अपघात झाला. घटनेच्यावेळी काही अंतरावर ग्रामस्थ उभे होते मात्र प्रवाह सुरु असल्याने त्याला वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न ते करू शकले नाही.महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत नागरिकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
विजेच्या तारेच्या शॉकने मोटरसायकस्वार ठार
By admin | Updated: June 15, 2015 23:35 IST