Join us

ठाण्यात निवडणूक वॉररुम अॅक्टीव्हेट

By admin | Updated: October 4, 2014 23:12 IST

सर्वच पक्षांनी निवडणूकीच्या सर्वच व्यूहरचनेसाठी आणि मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी तसेच उमेदवार आणि कार्यकत्र्याना डावपेचांचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉररुम सुरु केले आहेत.

जितेंद्र कालेकर - ठाणो
उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी निवडणूकीच्या सर्वच व्यूहरचनेसाठी आणि मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी तसेच उमेदवार आणि कार्यकत्र्याना डावपेचांचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉररुम सुरु केले आहेत. शिवसेना भाजपाने संपूर्ण जिल्हयासाठी मध्यवर्ती कार्यालय सुरु केले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या उमेदवारांच्या मात्र स्वतंत्र वॉररुम्स् आहेत. 
निवडणूकीचा प्रचार सुरु झाल्यानंतर ते थेट मतदानार्पयत वॉररुमची भूमिका अतिशय महत्वाची असते. आपआपल्या उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वॉररुमची निर्मिती करण्यात येते. शिवसेनेने टेंभी नाका येथे नेहमीप्रमाणो ‘सूर्या’ कार्यालयात आपला वॉररुम सुरु केली आहे. याठिकाणी प्रामुख्याने ठाणो शहर, ओवळा माजीवडा, कोपरी पाचपाखाडी आणि कळवा मुंब्रा या चार मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्या प्रचाराची आखणी केली जात असली तरी याठिकाणाहून संपूर्ण जिल्हयातल्या शिवसेनेच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे या कार्यालयाचे प्रमुख विलास जोशी यांनी सांगितले.
उमेदवारांना लागणारे प्रचार साहित्य, प्रचाराच्या पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या परवानग्या, प्रचार सभा, मोठया नेत्यांच्या सभा याचे सर्व कायदेशीर सोपस्कार याच कार्यालयातून करण्यात येत आहेत. याशिवाय, मतदारांची छानणी, मतदार नोंदणी, तसेच नविन मतदार यादीतील पुरवणी यादीतील नावांचा समावेश झाला की नाही याची सर्वच पडताळणी वॉररुममधूनच करण्यात येत आहे. मतदारांची छाननी विभागप्रमुखांकडील याद्या, तसेच गटप्रमुखांकडेही 8क्क् ते 9क्क् मतदारांचे काम देण्यात आले आहे. याशिवाय, आधीच्या यादीतील कोणती नावे वगळली गेली, कोण मृत पावले, कोण गावी गेले कोण परतले याची चाचपणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मोदी लाटेचा किती फायदा झाला, त्यात शिवसेनेची हक्काची मते किती, आणखी किती मते वाढविता येतील. याचाही याठिकाणी अभ्यास करण्यात येत आहे.
 
मनसेने मात्र, ठाणो शहर येथे शहरप्रमुखांच्या राजगड या मनसेच्या कार्यालयातच आणि ओवळा माजीवडयासाठी उमेदवाराच्या  मंत्रंजली या शिवाईनगर येथील निवास्थानीच वॉररुम तयार केली आहे. राष्ट्रवादीने मतदारसंघात मुख्यालय आणि उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाला वॉररुमचे रुप दिले आहे. अशीच परिस्थिती काँग्रेसमध्येही आहे.