Join us
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद सभापतिपदासाठी निवडणूक

By admin | Updated: March 19, 2015 01:21 IST

विधान परिषदेच्या नव्या सभापतींच्या निवडीसाठी शुक्रवारी निवडणूक होणार असल्याची माहिती उपसभापती वसंत डावखरे यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई : विधान परिषदेच्या नव्या सभापतींच्या निवडीसाठी शुक्रवारी निवडणूक होणार असल्याची माहिती उपसभापती वसंत डावखरे यांनी विधान परिषदेत दिली. सभापती निवडीच्या कार्यक्रमाने या पदावर कुणाची वर्णी लागते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने ही निवडणूक होत आहे.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या सूचनेनुसार सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी (ता.१९) दुपारी बारापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तर रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी येत्या शुक्रवारी निवडणूक होणार आहे. सभागृहात राष्ट्रवादीचे २८ सदस्य आहेत, तर भाजपाचे १२ सदस्य आहेत. संख्याबळानुसार सभापतिपद राष्ट्रवादीकडे तर भाजपाच्या वाट्याला उपसभापतिपद येण्याची शक्यता आहे. सभापतिपदासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. (प्रतिनिधी)