Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फरझाना इक्बाल यांची निवड

By स्नेहा मोरे | Updated: February 9, 2024 20:41 IST

मुंबईतील फरझाना इक्बाल-डांगे यांची नागपूर येथे १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई - मुंबईतील फरझाना इक्बाल-डांगे यांची नागपूर येथे १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय मुस्लिम परिषद, डॉ. मेघनाथ साहा सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकरी विचार मंच आणि छवि पब्लिकेशन्स या संस्थांमार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रा. जावेद पाशा, प्रा. रमेश पिसे, डॉ. असलम बारी, डॉ. वहिद पटेल आदी मान्यवर निमंत्रित आहेत. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित करण्यात आले आहे.

फरझाना इकबाल डांगे या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या एम.ए. अर्थशास्त्र पदवीधर असून त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या त्या माजी अध्यक्ष आणि सध्या मुंबई जिल्हाध्याच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. नाशिकच्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील कवयित्री संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली होती. आता नागपूर येथे भरणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले आहे.