Join us

निवडणूक खर्च प्राप्तिकराच्या रडारवर

By admin | Updated: September 18, 2014 01:55 IST

व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभाग सज्ज झाला असून मुंबई, पुणो आणि नागपूर येथे लवकरच चोवीस तास काम करणा:या नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे.

मनोज गडनीस - मुंबई
राज्यात पुढील महिन्यांत निवडणुकीत होणा:या पैशाच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभाग सज्ज झाला असून मुंबई, पुणो आणि नागपूर येथे लवकरच चोवीस तास काम करणा:या नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे. 
निवडणूक आयागाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर पैशाच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागालाही निर्देश दिले असून यानुसार, विभागाचे अधिकारी या काळात होणा:या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. विभागातील उच्चपदस्थ सुत्रंनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, निवडणूकांच्या रॅली व एकूणच उमेदवारातर्फे होणा:या खर्चाकडे विभागाचे विशेष लक्ष असून, उमेदवार जेव्हा उमेदावारी अर्जासोबत मालमत्तेच्या तपशीलाचे विवरण सादर करणार आहे, त्याकडेही विभागाचे लक्ष असेल. मालमत्तेच्या प्रतिज्ञापत्रच्या अनुषंगाने संबंधित उमेदवाराचे रिटर्नही तपासले जातील. 
निवडणूक रॅली व अन्य प्रचारासोबतच, विमानतळ, रेल्वे स्टेशन, फार्म हाऊस, हवाला एजंट आणि दलालाचे काम करणा:या सर्व घटकांवर विभागाचे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. दहा लाख रुपये अथवा त्यावरील रोख रकमेचा व्यवहार झाल्याची माहिती विभागाला मिळाली तर केवळ संबंधित उमेदवारच नव्हे तर त्याच्या पक्षाच्या मागेही चौकशीचा ससेमीरा लागण्याची शक्यता आहे. 
विभागाच्या अधिका:यांतर्फेच केवळ लक्ष ठेवले जाणार नसून या कामी नागरिकांनीही मदत करावी, या दृष्टीने मुंबई, नागपूर व पुणो येथे विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकाची घोषणा लवकरच होईल व त्या कक्षाला मिळणा:या माहितीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीमचीही उभारणी सध्या विभागातर्फे करण्यात येत आहे. या टीममध्ये प्रत्येकी पाच अधिकारी असतील. तर, प्राप्तिकर महासंचालक (इन्व्हेस्टिगेशन) हे त्याचे प्रमुख असतील. या कारवाईचा अहवाल निवडणूक आयुक्तांना वेळोवेळी सादर करण्यात येईल.
या काळात मोठय़ा नेत्यांची प्रामुख्याने हालचाल ही विमानतळावरून होत असल्याने विभागातर्फे एअर इंटेलिजन्स युनिटची ही स्थापना करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विमानतळांवर या युनिटच्या अधिका:यांची नेमणूक करण्यात येणार आहे. 
 
ज्या उमेदवारांना रोखीने व्यवहार करायचा आहे अथवा रोख रक्कम एका ठिकाणाहून दुस:या ठिकाणी न्यायची आहे, अशा उमेदवारांनी अथवा कार्यकत्र्यानी सोबत स्वत:चे सरकारी विभागातर्फे जारी केलेले ओळखपत्र व पॅन कार्ड ठेवणो बंधनकारक आहे.