Join us  

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेत चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 1:27 AM

शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. प्रतिष्ठेचे हे पद पदरात पाडून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे पुढच्या आठवड्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच काढण्यात आलेल्या सोडतीत मुंबईचे महापौरपद पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने महापौरपद तूर्तास सुरक्षित आहे, परंतु हे पद खुले झाल्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. प्रतिष्ठेचे हे पद पदरात पाडून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.मुंबईचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर म्हणून ओळखले जाणारे हे पद प्रतिष्ठेचे मानले जाते. अडीच वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या पदासाठी मुंबई महापालिकेत २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या पदाच्या आरक्षणाची सोडत नगरविकास विभागाने बुधवारी काढली. या सोडतीत मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील बळ वाढले आहे. राज्यातील सत्तासंघर्षापासून शिवसेनेचे महापौरपद सध्या सुरक्षित आहे. हे पद खुले झाल्यामुळे इच्छुकांची यादी वाढली आहे.पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपबरोबर युती तुटल्यास शिवसेनेसमोर त्यांच्या रूपात मोठा विरोधी पक्ष उभा राहणार आहे. भविष्यात त्यांच्याकडून शिवसेनेची कोंडी केली जाण्याची शक्यता असल्याने महापौरपद सक्षम नेतृत्वाकडे सोपविणे सेनेसाठी आवश्यक झाले आहे. या स्पर्धेत ज्येष्ठ नगरसेवक पुढे आहेत.स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव, वरळी येथील ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, माजी महापौर विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, मंगेश सातमकर यांची नावे चर्चेत आहेत. महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....तर भाजपची होईल सरशीराज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, संख्याबळानुसार शिवसेनेची स्थिती मजबूत आहे. तरी भाजप स्वत: महापौरपदासाठी उमेदवार उभा करून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने पालिकेत सत्तापालट घडवू शकतो किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून सेनेचा महापौरपदाचा उमेदवार पाडू शकतो, अशी बदलती राजकीय समीकरणे तयार होऊ शकतात.>अशी होऊ शकते फोडाफोडी...महापौरपदासाठी भाजपला समाजवादी पक्ष व राष्ट्रवादीचे प्रत्येकी किमान पाच, एमआयएमचे दोन व मनसेचा एक नगरसेवक फोडावा लागेल. अथवा काँग्रेसचे दहाहून अधिक नगरसेवक फोडावे लागतील. यापेक्षा कमी नगरसेवक फोडल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार फुटणाºया नगरसेवकाचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते.>पालिकेतीलपक्षीय बलाबलशिवसेना : तीन अपक्षांसह ९४ भाजप : ८२ अधिक २,काँग्रेस : ३०, राष्ट्रवादी : ८, समाजवादी पक्ष : ६,एमआयएम : २, मनसे : १

टॅग्स :मुंबई महानगरपालिका