Join us

वक्फ मंडळाकडून निवडणुकीबाबत आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:07 IST

नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर मुतवल्ली प्रवर्गातील सदस्याची निवडणुकीद्वारे निवड केली ...

नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर मुतवल्ली प्रवर्गातील सदस्याची निवडणुकीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत वक्फ संस्थांच्या पात्र मुतवल्लीची/व्यवस्थापकीय समितीच्या नामनिर्देशित सदस्याची मतदारयादी अद्ययावत करण्याबाबत मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी आवाहन केले आहे.

वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्याचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्याकरिता २०२०-२१ या वर्षापर्यंतचे संबंधित वक्फ संस्थेचे लेखापरीक्षण करून वार्षिक लेखे व त्या अनुषंगिक वर्गणी जमा करावयाची आहे. यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. ही कार्यवाही संबंधित वक्फ संस्थांनी ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन शेख यांनी केले आहे. राज्यातील सर्व वक्फ संस्थांचे मुतवल्ली/ व्यवस्थापकीय समितीचे सदस्य यांना हे आवाहन करण्यात आले आहे.