Join us

परदेशातून घरी आलेल्या मुलाला दिसला आईचा सांगाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 09:41 IST

ओशिवरा येथील उच्चभू्र वस्ती असलेल्या सोसायटीमध्ये आलिशान फ्लॅटमध्ये एकट्या राहत असलेल्या आशा केदार सहानी या ६५ वर्षांच्या वृद्धेचा सांगाडा आढळून आला आहे. परदेशात राहत असलेला मुलगा घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ओशिवरा येथील उच्चभू्र वस्ती असलेल्या सोसायटीमध्ये आलिशान फ्लॅटमध्ये एकट्या राहत असलेल्या आशा केदार सहानी या ६५ वर्षांच्या वृद्धेचा सांगाडा आढळून आला आहे. परदेशात राहत असलेला मुलगा घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून आशा यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की हत्या करण्यात आली, याचा उलगडा झालेला नाही. उतरीय तपासणीसाठी शव रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले.ओशिवºयातील वेल्स कॉड सोसायटीमध्ये आशा सहानी या एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा केदार हा आयटी इंजिनीअर असून गेल्या काही वर्षांपासून यूएसएमध्ये राहत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याचे आईशी बोलणे झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये काहीही संवाद झालेला नव्हता. केदार सहानी हा शनिवारी भारतात परतला. फ्लॅटचा दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला.चोरीच्या उद्देशाने हत्या ?आशा सहानी यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, एकट्या राहत असलेल्या आशा यांची चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. याची पोलीस चौकशी करत आहेत़