भरत उबाळे ल्ल शहापूर
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शहापूर शिवसेनेत जोरदार उलथापालथ सुरू झाली आहे. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी व आगामी पंचायत समित्या व जिल्हा परिषद निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी माजी आमदार दौलत दरोडा तसेच तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी स्वतंत्रपणो दोन वेगळ्या बैठका बोलवल्याने शहापूर शिवसेनेत जोरदार शीतयुद्ध सुरू झाले असून सेना सरळसरळ दोन गटांत विभागली गेली आहे. माजी आमदार दौलत दरोडा व तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांचे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. यामुळे शिवसैनिकांतही प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसैनिकांतील संभ्रम रोखण्यासाठी व गटातटांतील शीतयुद्ध रोखण्यासाठी विरोधी पक्षनेते तसेच जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांना दोन्ही गटांची समझोता बैठक घेण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत.
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. फक्त प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख निश्चित होण्याची औपचारिकता उरली आहे. या निवडणुका उंबरठय़ावर येऊन ठेपल्या असतानाच विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे कवित्व सेनेत धुमसू लागल्याने जोरदार शीतयुद्धाला तोंड फुटले आहे. पदाधिका:यांनी अपप्रचार केल्याने तसेच मतदानापूर्वीच्या शेवटच्या चार दिवसांत सेना पदाधिकारी विरोधात गेल्यानेच या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला, असा दौलत दरोडा यांचा आरोप आहे. विद्यमान आमदार म्हणून दरोडा यांनी या मतदारसंघातील विकासकामांकडे पाठ फिरविली. शिवाय, शिवसैनिकांना विश्वासात घेऊन गावपातळीवर पाठबळ देण्यात दरोडा पाच वर्षात कमी पडले, असा तालुकाप्रमुख मारुती धिर्डे गटाचा आरोप आहे.
या प्रकरणी ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी बैठक बोलवून शहापूर सेनेतील सध्याची अस्थिर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तो प्रयत्न त्यांच्याही अंगलट आला आहे. पाटील माजी आमदार दौलत दरोडांची एकतर्फी बाजू घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप दुस:या गटाकडून केला जाऊ लागला. भिवंडी तालुक्यातील रहिवासी असलेले पाटील यांचा जि.प. गट 2क्क्9 मध्ये आरक्षणात गेल्याने ते शहापूर तालुक्यातील दुर्गम कसारा-मोखावणो गटातून जि.प.वर निवडून गेले होते. या गटातून पाटील यांना सेनेचेच ग्रामीण उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. नंतर, उमेदवारी अर्ज काढून घेण्यात आला होता. तेव्हापासून पाटील व खाडे यांच्यात आलबेल राहिलेले नाही. या वेळी खाडे तालुकाप्रमुखांच्या गटात असल्याचा कांगावा केला जात असल्यानेही आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
शहापूर शिवसेनेतील दोन गट परस्परविरोधी उभे ठाकल्याने येथे प्रचंड उलथापालथ सुरू झाली आहे.
42क्क्4 ला राष्ट्रवादीचे म.ना. बरोरा यांच्याविरोधात पराभूत झाल्यानंतर त्याही वेळी माजी आमदार दौलत दरोडा यांनी सेनेत संघटनात्मक अस्थिरता आणून स्वतंत्र गट कार्यरत ठेवला होता. त्याचा फटका पंचायत समिती निवडणुकीत सेनेला बसला होता.
4सेनेतील गटातटांची धुमश्चक्री ओळखून संतोष शिंदे हे सेनेतून भाजपात दाखल झाले. मनसेचे तालुकाप्रमुख असलेले शिंदे विधानसभा निवडणूक काळात राजीनामा देऊन शिवसेनेत दाखल झाले होते.
42क्क्9 च्या जि.प. निवडणुकीत ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांना उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे यांनी कसारा-मोखावणो गटातून आव्हान दिले होते. यानिमित्ताने या दोघांतील वादही प्रकर्षाने पुढे आला आहे.