ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हा आणि संपर्कप्रमुख व कोपरी पाचपाखाडीतील उमेदवार एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक म्हणजे १००३१६ मते मिळवून अग्रस्थान प्राप्त केले आहे. तर सर्वात कमी मते मिळवून विजयी होण्याची कामगिरी भिवंडी पूर्व मधील शिवसेनेचे उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी पार पाडली आहे. शिंदे यांचे मताधिक्य देखील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ठरले आहे ते ५१८४९ इतके आहे.त्या खालोखाल मीरा-भार्इंदरमधील भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता यांनी ९१४६८ अशी दुसऱ्या क्रमांकाची विक्रमीमते भार्इंदर विधानसभा संघात मिळवून विजय प्राप्त केला आहे. त्यापुढे विजयी उमेदवार व त्यांच्या मतदान संख्येचा क्रम पुढील प्रमाणे आहे. -तिसऱ्या क्रमांकाची विजयी मते कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी ८६५३३ मते प्राप्त केली. चौथ्या क्रमांकाची ८५५४३ एवढी विजयी मते मुरबाड मतदारसंघात भाजपाचे किसन कथोरे यांनी प्राप्त केले. पाचव्या क्रमांकाची मते कल्याण ग्रामीणमधील सेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांनी मिळवलीत ती ८४११० होती. सहाव्या क्रमांकाची विजयी मते डोंबिवलीत भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी मिळविलीत ती ८३८७२ होती. सातव्या क्रमांकाची विजयी मते ऐरोली मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांनी ७६४४४ मते मिळवली होती. आठव्या क्रमांकाची मते ठाणे शहर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवा संजय केळकर यांनी ७०१८४ प्राप्त केली नवव्या क्रमांकाची विजयी मते ओवळा-माजीवडा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी ६८५७१ मिळविलीे. दहाव्या क्रमांकाची मते भिवंडी ग्रामीणमधील शिवसेनेचे शांताराम मोरे यांनी ५७०८२ इतकी मिळविली . अकराव्या क्रमांकाची मते शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा यांनी ५६१८३ मिळविली. बाराव्या क्रमांकाची विजयी मते बेलापूर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ५५३१६ इतकी मिळविली. तेराव्या क्रमांकाची विजयी मते कल्याण पश्चिममध्ये भाजपाचे नरेंद्र पवार यांनी ५४३८८ मिळविली. चौदाव्या क्रमांकाची विजयी मते अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. बालाजी किणीकर यांनी ४४९५९ मिळविली. पंधराव्या विजयी क्रमांकाची मते उल्हासनगरा राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांनी ४३७६० इतकी मिळविली. सोळाव्या क्रमांकाची विजयी मते भिवंडी पश्चिममध्ये भाजपाच्या महेश चौगुले यांनी मिळविली ती ४२४८३ होती. सतराव्या क्रमांकाची विजयी मते कल्याण पूर्व मधील अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड ती ३६३५७ होती. (विशेष प्रतिनिधी)
एकनाथ शिंदे फर्स्ट; म्हात्रे लास्ट !
By admin | Updated: October 22, 2014 23:20 IST