मुंबई : यंदाची पंचरंगी लढत व मतदारराजाने उत्स्फूर्तपणो केलेले मतदान याने आधीच दिग्गजांचे धाबे दणाणले आह़े त्यात एक्ङिाट पोलने भाजपाला दिलेला कौल अनेकांना बुचकळ्यात टाकणारा तर अनेकांना दिलासा देणारा ठरला आहे. एक्ङिाट पोलच्या अनुमानानंतर आता सगळेच उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आकडय़ांची जुळवाजुळव करण्यात मग्न झाले आहेत. मुंबईतील प्रमुख उमेदवारांना या एक्ङिाट पोलच्या भाकिताबद्दल काय वाटते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
कलिना मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार कप्तान मलिक म्हणाले की, एक्ङिाट पोल हे चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या आधाराने घेतले जातात. एका विधानसभेची लोकसंख्या ही जर लाखांच्या घरात आहे. आणि आपण एक्ङिाट पोलसाठी केवळ तेथील शंभर ते पन्नास लोकांचे अर्थात मतदारांचे सर्वेक्षण करत असू आणि त्यातून एक्ङिाट पोल उभे करत असू; तर ते साफ चुकीचे आहे. अशा एक्ङिाट पोल्सना काहीही अर्थ नाही.
एक्ङिाट पोल म्हणजे केवळ अंदाज असतात आणि अंदाज वर्तवायला आपण ज्योतिषी नाही. कारण अंदाज नेहमीच खरे ठरतात, असेही नसल्याचे कुलाब्यातील शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सपकाळ म्हणाले. बहुतेक वेळा ते चुकतातही. त्यामुळे आपण केलेल्या अभ्यासावर अशाप्रकारे अंदाज वर्तवून उगाच लोकांना नको ते टेन्शन देऊ नये. त्यापेक्षा 19 ऑक्टोबरला असलेल्या निकालानंतर त्याचे योग्य विश्लेषण करावे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात पंचरंगी लढती असल्याने एक्ङिाट पोल कितपत खरे ठरतील, याबाबत साशंकता असल्याचे शिवडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नंदकुमार काटकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कारण उमेदवारांची संख्या अधिक असल्याने कोणताही उमेदवार काही हजार मतांच्या फरकाने निवडून येईल. भारतीय जनता पार्टीला एक्ङिाट पोलमध्ये बहुमत दाखवण्यात येत आहे. निवडणुकांआधी ठरावीक एजन्सींना हाताशी घेऊन अशाप्रकारे वातावरणनिर्मिती करण्यात भाजपाचा हातखंडा आहे.
भाजपाला बहुमत दिल्याच्या संकेतांनंतर मलबार हिलमधील भाजपाचे उमेदवार मंगलप्रभात लोढा कमालीच्या उत्साहात दिसले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणोच विधानसभा निवडणुकीतही भाजपालाच स्पष्ट बहुमत मिळेल. विविध एक्ङिाट पोलमधून दाखवण्यात येणा:या या पोलमध्ये अधिक विश्वासार्हता आहे. अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात येतो. त्यामुळे रविवारी निकालाच्या दिवशी एक्ङिाट पोलवर शिक्कामोर्तब झालेले दिसेल.
शिवसेना पुरस्कृत अभासेच्या भायखळ्यातील उमेदवार गीता गवळी यांना मात्र हा सगळा टीआरपीचा फार्स असल्यासारखे वाटते. विविध वाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या एक्ङिाट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळेल असे समोर येते आहे. शिवाय, काही एक्ङिाट पोलचे अंदाज वेगवेगळे आहेत. त्यामुळे या पोलमध्ये काहीच तथ्य नसून हे सगळेच दिशाहीन करून ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी केले जाणारे हे कार्यक्रम आहेत. मतदानापूर्वी आणि मतदानानंतर सुरू असणारे हे एक्ङिाट पोल्स केवळ सामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करतात, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीत चर्चेत येणारे हे एक्ङिाट पोल चुकीच्या पद्धतीने घेतले जातात, हे मत आहे शिवडी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांचे. गेल्या काही वर्षात वृत्तवाहिन्या आणि संस्थांकडून होणारे सव्रेक्षण हे ‘पेड’ असण्याची शक्यताही टाळता येत नाही. त्यामुळेच हे एक्ङिाट पोल्स साफ चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एक्ङिाट पोलमधून काहीही समोर आलेले असले तरीदेखील ते चुकीचे ठरतील, असे घाटकोपर पश्चिममधील शिवसेनेचे उमेदवार सुधीर मोरे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, कोणावर विश्वास ठेवायचा? कोणी सांगतो शिवसेनेचे 9क्-95 उमेदवार निवडून येतील, तर कोण म्हणतो 7क् ते 75 येतील. हे एक्ङिाट पोल वरवरच्या निरीक्षणावरून केले जातात. प्रत्यक्षात मतदारसंघातली खरी परिस्थिती भलतीच असते. त्यामुळे अशा बिनबुडाच्या निरीक्षणांमुळे कोणताही फरक पडत नाही. यंदा शिवसैनिकांमध्ये चीड होती. ती मतांमधून व्यक्त होईल. (प्रतिनिधी)
एक्ङिाट पोल म्हणजेच जनमत चाचण्यांनी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा निष्कर्ष काढला आहे. जनमत चाचणीचे अंदाज खरे ठरणार असल्याने रिपाइंने एक्ङिाट पोलचे स्वागत केले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अचूक अंदाज चाणक्यने वर्तविला होता. आणि आता विधानसभेला महाराष्ट्रासह हरियाणातही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा चाणक्यचा अंदाज आहे.
- रामदास आठवले (अध्यक्ष, रिपाइं)
एक्ङिाट पोलवर माझा विश्वास नाही. हे एक्ङिाट पोल ‘मॅनेज’ केलेले असल्याचे दिसून येत़े मुळात याला अर्थ नाही. मी याबाबत कोर्टात रिट याचिका दाखल करणार आहे आणि गरज पडल्यास सुप्रीम कोर्टातही जाईन. आता व्हॉट्सअॅपवर या एक्ङिाट पोलची खिल्ली उडवली जात आहे. भाजपाच्या 288 जागांवरच विजय दाखवून द्या, अशा प्रकारची खिल्ली उडवणारे मेसेज फिरत आहेत.
- प्रसाद लाड (राष्ट्रवादी उमेदवार, सायन कोळीवाडा)
म्हाडा पदाधिका:यांना विधानसभेत प्रवेशाची आशा !
च्विधानसभा निवडणुकीचा निकाल आता काही अवघ्या तासांवर आला असताना मतदानासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर केलेल्या उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. विविध वृत्तवाहिन्यांचा ‘सव्र्हे’ हा भाजपाच्या बाजूने असला तरी कॉँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले म्हाडा व अन्य महामंडळांचे पदाधिकारी मात्र आपल्या विजयाबाबत ठाम आहेत.
च्म्हाडाचे मुंबई मंडळाचे सभापती युसूफ अब्राहनी, कोकण मंडळाचे सभापती माणिक जगताप हे कॉँग्रेसच्या तर मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळाचे सभापती प्रसाद लाड, महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त प्रवीण नाईक हे कॉँग्रेसमधून आणि न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणो यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविली आहे. हे सर्व जण विजयाबाबत आशावादी आहेत.