Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुळांवर संपले अठराशे जीव

By admin | Updated: April 5, 2016 17:59 IST

रूळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेने उघडलेल्या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वे आरपीएफने (रेल्वे सुरक्षा दल) तब्बल १६ हजार ६७४ केसेसची नोंद केली आहे.

मुंबई : रूळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेने उघडलेल्या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वे आरपीएफने (रेल्वे सुरक्षा दल) तब्बल १६ हजार ६७४ केसेसची नोंद केली आहे. मात्र तरीही अपघातांची संख्या फारशी कमी झाल्याचे दिसून येत नाही.कुठे घडतात प्रकार?दादर, माहीम, वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, नालासोपारा, वसई, विरार या स्थानकांजवळ मोठ्या प्रमाणात रूळ ओलांडण्याचे प्रकार घडतात. उपाय काय योजले?रूळ ओलांडून अपघात होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीने नवीन पादचारी पूल बांधण्याचे नियोजन केले आहे. रेल्वे अर्थसंकल्पातही पादचारी पुलांसाठी आर्थिक निधी पश्चिम रेल्वेला मिळाला आहे.