Join us

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री प.रे.कडून आठ विशेष फेऱ्या

By admin | Updated: December 29, 2015 02:25 IST

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना किंवा घरी परतणाऱ्यांसाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेकडून आठ विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

- शेवटची विरार लोकल पहाटे ३.२0 वाजता

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना किंवा घरी परतणाऱ्यांसाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेकडून आठ विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेटदरम्यान या धीम्या लोकल म्हणून चालवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. चर्चगेटहून मध्यरात्री सव्वा एक वाजता, त्यानंतर १.५५ वाजता, २.५५ वाजता आणि ३.२0 वाजता या विशेष लोकल सोडण्यात येतील; तर विरारहून चर्चगेटसाठी मध्यरात्री सव्वा बारा वाजता, पावणे एक वाजता, १.४0 वाजता आणि २.५५ वाजता सोडण्यात येतील.