Join us

अंबरनाथ पालिकेच्या रुग्णालयात आढळले डेंग्यूसदृश आठ रु ग्ण

By admin | Updated: November 28, 2014 22:48 IST

मुंबई आणि परिसरात थैमान घातलेला डेंग्यू आता अंबरनाथमध्ये पसरत असून शहरातील विविध ठिकाणच्या आठ डेंग्यूसदृश रुग्णांना याची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

अंबरनाथ : मुंबई आणि परिसरात थैमान घातलेला डेंग्यू आता अंबरनाथमध्ये पसरत  असून शहरातील विविध ठिकाणच्या आठ डेंग्यूसदृश रुग्णांना याची लागण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरात  एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या डॉ. बी.जी. छाया रुग्णालयात या सर्वावर उपचार सुरू आहेत. 
  अंबरनाथच्या पश्चिम भागातील कमलाकरनगर, पनवेलकर गार्डन, कोहोजगाव आदी परिसरातील चार्वी सुब्रrाण्यम (7), बिना सुब्रrाण्यम (9) मार्टीन बंडी (21), साक्षी जाधव (12), शमीम बुडे (12), सुनीता चलवादी (21), मुमताज शेख (3क्), वनेश्वरी (34 ) यांच्या प्रकृतीत डेंग्यूची लक्षणो जाणवू लागल्याने पालिकेच्या डॉ. बी.जी. छाया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व आठ डेंग्यूसदृश रुग्णांचे डेंग्यू पॉङिाटिव्ह वैद्यकीय अहवाल शासकीय आरोग्य विभाग आणि शासकीय रुग्णालयाकडे तपासणीकरिता पाठवण्यात आल्याची माहिती छाया रुग्णालयाच्या डॉ. श्रीमती आशा रायबोळे यांनी दिली. आठ दिवसांपूर्वी यश चनई  हा सात वर्षाचा मुलगा डेंग्यूने मरण पावला होता. शहरात अन्य रुग्णालयांतदेखील अशा प्रकारच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समजते.  
    दरम्यान, शहरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आवश्यक ती खबरदारी घेतली असून लागण झालेल्यांना आवश्यक ते कीट स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आल्याचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले. नागरिकांनाही परिसर स्वच्छ राहील, याकडे लक्ष देण्यास त्यांनी सांगितले. उद्या सकाळी 11 वाजता पालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पुन्हा आढावा घेऊन यंत्रणा आणखी सज्ज करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  
  दाखल करण्यात आलेल्या रु ग्णांना थंडी वाजून ताप येणो, अंग खाजवल्यावर रक्त येणो असे प्रकार दिसू लागतात. छाया रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांवर योग्य उपचार सुरू असून गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवण्यात येईल, असे डॉ. आशीष परमार यांनी सांगितले. आतार्पयत सुमारे 8 ते 1क् रु ग्ण आले होते. त्यांना उपचार करून घरी पाठविण्या आले. या एका महिन्यात सुमारे 6क् रुग्ण शहरात आढळून आल्याचे डॉ. परमार म्हणाले. या रुग्णालयात अतिशय अल्प दरात उपचाराचे कीट उपलब्ध केले आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले आहे. 
   डेंग्यूसदृश रुग्ण आढळलेल्या ठिकाणासह सर्व ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी जितेंद्र गोसावी यांनी दिली. आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांनीही घटनेची गंभीर दखल घेतली असून विशेष स्वच्छता ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  (प्रतिनिधी)