Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयआरसीटीसीच्या ताफ्यात येणार आठ नवीन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 06:09 IST

इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)तर्फे राज्यातील आणि देशातील धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या ठिकाणी सहलींचे आयोजन केले जाते.

मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)तर्फे राज्यातील आणि देशातील धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या ठिकाणी सहलींचे आयोजन केले जाते. यासाठी विशेष मेल, एक्स्प्रेस आयआरसीटीसीकडून आरक्षित केल्या जातात. मात्र आयआरसीटीसी आता स्वत:च्या मेल, एक्स्प्रेस चालविण्याची शक्यता आहे. आयआरसीटीसीने रेल्वे बोर्डाकडे ७ ते ८ मेल, एक्स्प्रेसच्या मागणीचा प्रस्ताव दिला. मात्र अजून प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याचे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.