Join us

आठ अपक्ष आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

By admin | Updated: September 16, 2014 03:12 IST

काँग्रेसने चार अपक्ष आमदार आपल्याकडे खेचल्यानंतर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आज आठ अपक्ष आमदारांना आपल्यात सामावून घेतले.

मुंबई : काँग्रेसने चार अपक्ष आमदार आपल्याकडे खेचल्यानंतर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आज आठ अपक्ष आमदारांना आपल्यात सामावून घेतले. या आठही जणांना राष्ट्रवादीतर्फे विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
राष्ट्रवादीमध्ये दाखल होणा:यांमध्ये मानसिंगराव नाईक (शिराळा), बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), मकरंद पाटील (वाई), रमेश थोरात (दौंड), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), सुरेश देशमुख (वर्धा), शरद गावित (नवापूर) आणि कृषिभूषण साहेबराव पाटील (अंमळनेर) या आमदारांचा समावेश आहे. याशिवाय, विलास लांडे (भोसरी), लक्ष्मण जगताप (पिंपरी-चिंचवड) आणि रवी राणा (बडनेरा) हे तीन अपक्ष आमदारही आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असे म्हटले जात होते. पण, या तिन्ही आमदारांनी तूर्त तरी घडय़ाळापासून दूर राहणो पसंत केले आहे. लांडे आणि जगताप लवकरच राष्ट्रवादीत येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळाची जागा आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. 2क्क्9 मध्ये तिथे मानसिंगराव नाईक अपक्ष लढून जिंकले. वाईची जागाही काँग्रेसकडे आहे. तिथे मकरंद पाटील 
अपक्ष जिंकले आणि नंतर राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य झाले. तीच परिस्थिती अंमळनेरची. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी बंडखोरी करून काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता.
 
भ्रमणध्वनीवरून प्रवेश!
अपक्ष आमदारांचा पक्षप्रवेश सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांचा फोन आला. स्पीकर फोनवरून सोपल यांचे बोलणो पवार यांनी पत्रकारांना ऐकविले. आपण राष्ट्रवादीत असल्याचे सोपल यांनी स्पष्ट करताच ‘सोपल यांनी फोनवरून प्रवेश घेतला आहे का, असा प्रश्न एका पत्रकाराने केला. त्यावर पवार म्हणाले, सोपल कुठूनही प्रवेश घेऊ शकतात!