Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी टोळीचे आठ गँगस्टर गजाआड

By admin | Updated: October 18, 2015 01:52 IST

चेंबूरमधील व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. या प्रकरणी सुरेश पुजारी टोळीच्या

मुंबई : चेंबूरमधील व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. या प्रकरणी सुरेश पुजारी टोळीच्या आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि सात काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.दोन महिन्यांपासून चेंबूर परिसरातील व्यावसायिकाला या टोळीकडून धमकीचे फोन येत होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख सुरेश पुजारी अशी सांगितली होती. त्यानंतर त्याने उल्हासनगरमधील केबल व्यावसायिकावर गोळीबार केल्याचा आणि त्यानंतर स्वत: दिलेल्या प्रतिक्रियेचा युट़्युबवर असलेला व्हीडिओ बघण्यास सांगून ५ कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास असे परिणाम भोगावे लागतील असे सांगितले. या बाबत व्यावसायिकाने आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. (प्रतिनिधी)