Join us

आठ दिवस लाटांचे... मुंबईकरांनो, 'या' तारखांना समुद्रकिनारी जाणं टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:43 IST

चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात

मुंबई : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र या काळात तब्बल आठ दिवस समुद्रामध्ये मोठी भरती असणार आहे. या वेळी लाटांची उंची साडेचार मीटरपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी जाणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत.

समुद्रात साडेचार मीटरपेक्षा मोठी भरती असताना अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी तुंबते. यासाठी पालिकेने नरिमन पॉइंट, गवालिया टँक, वांद्रे, कुर्ला, बीकेसी, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली या केंद्रांवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच १३२ प्रशिक्षित जवान रेस्क्यू आॅपरेशनसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री घेऊन तैनात आहेत. तर गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या चौपाट्यांवर ९४ जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. मोठ्या भरतीचे दिवस (जुलै महिना)तारीख वेळ लाटांची उंची४  स. ११.३८ ४.५७मीटर ५  दु. १२.२३ ४.६३मीटर. ६  दु. १.०६ ४.६२ मीटर ७  दु. १.४६ ४.५४ मीटर २१  दु. १२.४३ ४.५४ मीटर २२  दु. १.२२ ४.६३ मीटर २३  दु. २.०३ ४.६६ मीटर २४  दु. २.४५ ४.६१ मीटर