Join us

आठ लाचखोर गजाआड

By admin | Updated: October 21, 2014 22:50 IST

येथील नगररचना कार्यालयातील लाच प्रकरणातील तीन अधिकारी आणि पाच खासगी दलाल अशा आठ आरोपींना येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अलिबाग : येथील नगररचना कार्यालयातील लाच प्रकरणातील तीन अधिकारी आणि पाच खासगी दलाल अशा आठ आरोपींना येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २३ तारखेला त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केल्याने त्यांची दिवाळी पोलीस कोठडीतच होईल.चार लाख ३३ हजार रुपयांच्या लाचेच्या मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी नगररचनाकार अधिकारी पंडित, सहायक संचालक दीक्षा सावंत, टायपिस्ट टिके आणि खासगी दलाल रुपेश घरत यांना अटक केली होती. मंगळवारी सहाय्यक नगररचना अधिकारी राठोड, खासगी दलाल रामकृष्ण हल्याळे, विजय म्हात्रे, प्रदीप माने या फरार आरोपींना अटक केली.पनवेल येथील तक्रारदाराने बहिणाच्या नावाने कर्जत तालुक्यातील माणगावतर्फे वरेडी येथील जागेत निवासी बांधकामाकरिता १० फेब्रुवारी रोजी परवानगीबाबत चार प्रतीमध्ये प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात केला होता. त्यातील एक सहाय्यक संचालक नगररचना विभागाकडे अभिप्रायासाठी आली होती, मात्र या विभागाने तब्बल २५ वेळा तक्रारदाराला कागदपत्रांची पूर्तता दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. कामासाठी राठोड यांनी स्वत:साठी एक ते दीड लाख रुपये मागितले.