Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईद-ए-मिलाद उत्साहात

By admin | Updated: January 4, 2015 22:42 IST

मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन अर्थात ईद-ए-मिलाद रविवारी ठाणे, कल्याण, भिवंडीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उत्साहात साजरी झाली

ठाणे : मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन अर्थात ईद-ए-मिलाद रविवारी ठाणे, कल्याण, भिवंडीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी जुलूस काढण्यात आले होते. तसेच सामाजिक उपक्रम राबविले होते. शहरातील राबोडी, हाजुरी, इंदिरानगर परिसरातील मुस्लिम बांधवांनी जुलूस काढले होते. तसेच एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.