Join us  

शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणार- शिक्षणमंत्री विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 2:24 AM

शालेय शिक्षकांना अध्ययानाबरोबरच अनेक कामांमध्ये सहभागी व्हावे लागते. त्यामुळे शैक्षणिक कामांसाठी शिक्षकांना वेळ राहत नाही. शिक्षकांना देण्यात येणारी ८० टक्के अशैक्षणिक कामे तत्काळ बंद करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.

मुंबई : शालेय शिक्षकांना अध्ययानाबरोबरच अनेक कामांमध्ये सहभागी व्हावे लागते. त्यामुळे शैक्षणिक कामांसाठी शिक्षकांना वेळ राहत नाही. शिक्षकांना देण्यात येणारी ८० टक्के अशैक्षणिक कामे तत्काळ बंद करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे १२ वे द्वैवार्षिक अधिवेशन यंदा मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील विविध शाळा या विविध खात्याअंतर्गत येतात. अनेकांचा समज आहे शाळांची सर्व कामे ही शालेय शिक्षण खात्याअंतर्गत येतात. ुपण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. तसेच, गेल्या २५ वर्षांपासून शिक्षकांवर अशैक्षणिक कामांजा बोजा पडत होता. दिवसेंदिवस हा बोजा वाढत असल्याने शिक्षक त्रस्त असल्याचे शिक्षकांनी वारंवार शिक्षणमंत्र्यांना सांगितले होते. या अधिवेशनाला राज्यभरातून शिक्षक उपस्थित होते.या अधिवेशनावेळी शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना हे आश्वासन दिले. शालेय शिक्षण खात्याअंतर्गत न येणाºया शाळांमधील शिक्षकांचे अशैक्षणिक काम बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ज्या खात्याअंतर्गत अन्य शाळा येतात, त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच, शिक्षकांच्या अन्य प्रश्नांना शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केली. शिक्षकांची कर्तव्ये आणि सातवा वेतन आयोग या विषयावर अधिवेशनात चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :विनोद तावडे